मोठी बातमी! भारतीय सीमेच्या दिशेने सरकत आहे पाक आर्मी, सरकारने जारी केला अलर्ट..


नवी दिल्ली : भारतीय सीमेजवळ पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने आपल्या लष्कराच्या हालचाली वाढवल्याने भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने भडकावू आणि उकसवणाऱ्या कारवाया सुरू आहेत, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढण्याची चिन्हं आहेत.

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारतीय सैन्यातील दोन योद्ध्या, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यासह पत्रकार परिषदेत पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या लढाईबाबत माहिती दिली. यावेळी मिसरी यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानी सैन्य परिस्थिती आणखी बिघडवण्याच्या आक्रमक हेतूने सीमेकडे सैनिक पाठवत आहे. मेजर जनरल सोफिया कुरेशी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानने पश्चिम सीमेवर लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.

त्यांनी सांगितलं की पाक लष्कराने भारतीय हवाई तळं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांचा हल्ला अयशस्वी केला. यावेळी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लढाऊ विमाने आणि लॉइटरिंग म्युनिशन वापरण्यात आले, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व धोके निष्प्रभ ठरवले.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देशभरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर सतर्क असून, नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने स्पष्ट सांगितले आहे की, भारत युद्ध टाळू इच्छितो, पण जर कोणी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल, तर त्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल.

पाकिस्तानी सैन्याने आदमपूर येथील भारताच्या S-400 प्रणाली नष्ट केल्याचा खोटा दावा केला, परंतु वास्तव हे आहे की भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी संपूर्ण हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मेजर जनरल कुरेशी म्हणाल्या, आम्ही पाकिस्तानी सैन्याला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले आहे, तरीही आम्हाला तणाव नको आहे.”भारतीय सशस्त्र दलांनी वारंवार सांगितले आहे की त्यांना तणाव नको आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!