पुण्यात शिवसृष्टीच्या गेटवर संतापजनक प्रकार, व्हिडिओ व्हायरल, मराठा कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यातील आंबेगाव परिसरात उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक शिवसृष्टी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मराठा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

तसेच या घटनेत अमोल अरुण कुलकर्णी या व्यक्तीने शिवसृष्टीच्या गेटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सूचना फलकावरच लघुशंका केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अमोल कुलकर्णी आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अपमान करणाऱ्या या कृत्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर विविध संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी मोर्चा काढण्याची चेतावणी दिली आहे.

पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली असून, संबंधित व्यक्तींवर सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यासंदर्भात भारतीय दंड संहितेनुसार कलमाखाली कारवाई केली जात आहे. पुणे शहर पोलिसांकडून या प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!