गर्भलिंगनिदान चाचणीची खबर देणाऱ्यास आता मिळणार पारितोषिक, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…


गेल्या काही वर्षात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचे जन्मदराचे प्रमाण घटले असून प्रति १००० मुलांमागे ८८९ मुली असे हे प्रमाण झाले आहे, यामुळे ही चिंताजनक बाब आहे. यामुळे यावर उपाय करणे आवश्यक आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एक निर्णय घेतला आहे.

गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी गर्भलिंगनिदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती द्यावी, अशी माहिती सिद्ध झाल्यास माहिती देणारास पारितोषिक देण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या निर्णयामुळे काय बदल होणार का? हे लवकरच समजेल.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिलांचे सक्षमीकरण, महिलांशी निगडीत विविध कायदे व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी गर्भलिंग निदानास प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे कायदा १९९४ सुधारीत कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

तसेच वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ति वावरत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यास त्यावर थेट कारवाई करता येईल. त्यासाठी http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे.

तसेच १८०० २३३ ४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही लोक तक्रार नोंदवू शकता. तक्रार देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवली जाते. या तक्रारीची अंमलबजावणी होऊन स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात यश आल्यास तक्रारदारास शासनातर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. तरी नागरिकांनी गर्भलिंग चाचण्याबद्दल प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

दरम्यान, बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या योजना त्यांचे अधिकार याबाबत जनजागृती करणे यासाठी सर्व विभागांनी ग्रामपातळीपर्यंत काम करावे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास श्रीमती सुवर्णा जाधव, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, एपीआय आरती जाधव, पीएसआय कांचन मिरघे, अॅड आशा शेरखाने, रेणुका घुले, ज्योती पत्की, मयुरी कांबळे, डॉ. सारिका लांडगे, संगिता साळुंखे, माविम समन्वयक चंदनसिंग राठोड, डॉ. एम. आर. लढा आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!