‘केतनची एक गोष्ट खटकली, त्याने…’; सियाच्या पोलिस चौकशीत उलगडलं लग्न न करण्याचं कारण

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा तपास पुढे जाताच पोलिसांनी तो हत्येचा कट असल्याचा दावा केला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, दोघांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती सियाला होती. त्याचाच फायदा घेत त्याला ट्रेकच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलण्याचा आणि संपूर्ण प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा कट रचण्यात आल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, आरोपी सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. केतनला टक्कल होते आणि तो डोक्यावर केसांचा विग वापरायचा, ही गोष्ट सियाला प्रचंड खटकत होती. याच कारणावरून तिच्या मनात केतनबद्दल कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. शेवटी तिने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचे ठरवले.

गुन्हा उघडकीस आल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, अटक झाल्यानंतर तुरुंगात सियाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सिया ही तिचे आई-वडील आणि भावासोबत राहत होती. मात्र, या कृत्यामुळे कुटुंबाने तिच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसते. सध्या तिचे वडील आजारपणामुळे रुग्णालयात दाखल असून आई त्यांच्यासोबत आहे.

दुसरीकडे, या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रियकर चेतन चौधरी याला भेटण्यासाठी मात्र त्याचे वडील तुरुंगात येऊन गेले आहेत.के तनच्या विगवरून सुरू झालेला हा वाद थेट दरीत