लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रूपये खात्यात आजपासून होणार जमा, मंत्री आदिती तटकरेंची माहिती…

पणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही माहिती राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना सक्षम करणे हा आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य येऊ शकेल.

मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात एक महत्त्वाचे आवाहनही केले आहे. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी, सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे.

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना भविष्यातील हप्ते मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, लाभार्थ्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा अखंड लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
