अश्लील मेसेज, धमक्या अन् मानसिक छळ; NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची संतापजनक कृत्ये उघड, गुन्हा दाखल..


छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित एका पदाधिकाऱ्यावर महिला अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पैठण तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकाऱ्याला आरोपी युवराज चावरे याने वारंवार व्हॉट्सॲपवर अश्लील संदेश आणि व्हिडीओ पाठवले. तसेच बदनामी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

युवराज चावरे हा स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगत महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “मला तुला पर्सनल भेटायचं आहे” अशा प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज पाठवून संबंधित अधिकाऱ्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे.

या प्रकाराला विरोध केल्यानंतर आरोपीची मुजोरी आणखी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!