प्रयागराजमध्ये भाविकांची संख्या 41 कोटींवर, भाविकांनी केले पवित्र स्नान, अनेक व्हीआयपी लावणार हजेरी…

प्रयागराज : उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात देश विदेशातून अनेकजण हजेरी लावत आहेत. त्रिवेणी संगमात पवित्र डुबकी घेण्यासाठी महाकुंभात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. आतापर्यंत जवळपास ४१ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाची पर्वणी साधली आहे.

लाखो लोक आपल्या नातलगांसह संगमात स्नान करत आहेत. प्रशासनाने दावा केला आहे की, जर अशीच गर्दी राहिली तर महाकुंभ मेळा संपेपर्यंत भाविकांची संख्या ६० कोटींच्या पुढे पोहोचेल, असे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
देशाच्या अनेक राज्यातून संगमात पवित्र स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या मते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आमचे सर्व दु:ख आणि कष्ट विसरून गेल्याची भावना व्यक्त केली. तसेच मुलांनाही खूप छान वाटले, अनेकजण येण्यासाठी निघाले आहेत.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री आज प्रयागराजमध्ये पवित्र स्नानासाठी हजेरी लावणार आहेत. मोठे उद्योजक देखील येत आहेत.

दरम्यान, महाकुंभात लोक दिवस-रात्र पायी चालत १० ते १२ किमी चे अंतर आनंदात पार करत आहेत. यामुळे अनेकजण मोठा पायपीट करून याठिकाणी येत आहेत. यावेळी लांब पार्किंग असल्याने अनेकांना याचा त्रास देखील होत असल्याचे दिसून येत आहे. पण गर्दीच मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्याय उपलब्ध नाही.