काय सांगता! आता फोनवर फ्रीमध्ये पाहता येणार IPL, ‘हे’ App करा इंस्टॉल…!

मुंबई : आजपासून IPL 2023 सुरू होत आहे जे तुम्ही आता तुमच्या फोनवर फ्रीमध्ये पाहू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी JioCinema वर IPL 2023 पाहता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या IPL 2023 चे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर 4K UHD मध्ये होणार आहे.
दरम्यान, IPL 2023 JioCinema वर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. तुम्ही ते तुमच्या फोन आणि स्मार्ट टीव्हीवर सहज पाहू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त जिओ सिम कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे JioFiber ब्रॉडबँड असेल तर तुम्ही Jio सेट टॉप बॉक्सवर IPL 2023 फ्री स्ट्रीम करू शकता.
तसेच यामध्ये कंपनीच्या क्रिकेट बेस प्लॅन येथे आहेत. 219 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. यासोबतच दररोज 3 GB डेटा दिला जात आहे. संपूर्ण वैधता दरम्यान तुम्हाला 44 GB डेटा दिला जात आहे.
यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर दररोज 100 एसएमएसही दिले जात आहेत. यामध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.