आता असंघटित कामगारांनाही मिळणार दरमहा ₹३००० पेन्शन, जाणून घ्या ‘PM-SYM’ योजनेचे फायदे…

नवी दिल्ली : देशातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारने आणलेली प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही खरोखरच दिलासादायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ₹ ३,००० निश्चित पेन्शन मिळणार असून, वयोवृद्ध अवस्थेत आर्थिक आधार मिळवून देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

ही योजना विशेषतः लहान शेतकरी, हातगाडी चालक, रिक्षाचालक, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बांधकाम कामगार आणि घरगुती कामगारांसाठी राबवण्यात आली आहे. देशातील मोठा वर्ग असंघटित क्षेत्रात काम करणारा असल्याने, लाखो कामगारांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.

पेन्शन रक्कम: वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ₹३,००० निश्चित पेन्शन
योगदान रक्कम: अर्जदाराच्या वयानुसार दरमहा ₹५५ ते ₹२०० पर्यंत योगदान; उर्वरित रक्कम सरकारकडून जमा
कुटुंब पेन्शन: सदस्याच्या मृत्यूनंतर, पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50% रक्कम
लवचिकता: इच्छेनुसार योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय
व्यवस्थापन: योजना भारतीय आयुर्विमा महामंडळद्वारे चालवली जाते

कोण घेऊ शकतो लाभ?
वय मर्यादा: १८ ते ४० वर्षे
मासिक उत्पन्न: ₹१५,००० किंवा त्यापेक्षा कमी
रोजगार क्षेत्र: रस्त्यावरील विक्रेते, कचरा गोळा करणारे, बांधकाम मजूर, घरकामगार, शेतमजूर, बीडी कामगार, मच्छीमार, चामडे कामगार, विणकर आदी
पात्रतेच्या अटी…
EPF, ESIC किंवा NPS सारख्या इतर योजनांमध्ये समाविष्ट नसावा
आयकर भरणारा नसावा
इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)
बचत बँक खाते किंवा जन धन खाते (IFSC कोडसह)
नोंदणी प्रक्रिया…
जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर वर भेट द्या.
आधार आणि बँक खात्याचे तपशील सादर करा.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्या.
CSC ऑपरेटरकडून ऑनलाइन फॉर्म भरला जातो.
पहिल्या महिन्याचे योगदान रोख स्वरूपात भरावे लागते.
त्यानंतर बँक खात्यातून ऑटो-डेबिट सुविधा सक्रिय केली जाते.
