आता जमीन मोजणी प्रक्रियेत मोठे बदल! शेतकऱ्यांचे वादही मिटणार, शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आली समोर…


मुंबई : शेतकऱ्यांना शेतात जमीन मोजणी करताना अनेक अडचणी येतात. सातबारा धारकांची संख्या जास्त असलेल्या गटांमध्ये स्पष्ट नकाशे नसल्यामुळे वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी व मोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

असे असताना आता या पार्श्ववभूमीवर भूमी अभिलेख विभागाने शेतजमिनीच्या मोजणी प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी एकाच सर्वे क्रमांकातील पोटहिश्शांची मोजणी करताना एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मोजणीसंदर्भात शेजारच्या जमीनमालकांना नोटीस देण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आली आहे.

या नोटीसा स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात येणार असून, त्याची पोहोच झाल्यानंतरच मोजणी सुरू होणार आहे. मोजणीपूर्वी संबंधित जागेवर मोजणीचे फलक लावणे बंधनकारक आहे. यामध्ये त्या फलकाचा फोटो वेळ व दिनांकासह GIS पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल नियम, 1969 नुसार उपविभागातील पोट हिश्शांची मोजणी, आकारणी आणि खर्च वसुली यासाठी ठरवलेले नियम वेळोवेळी सुधारित करण्यात आले आहेत.

यामध्ये मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागेचा नकाशा ग्रामपंचायत कार्यालयात आणि ‘आपली चावडी’ पोर्टलवर दहा दिवसांसाठी प्रसिद्ध केला जाईल. या कालावधीत कुणी आक्षेप घेतल्यास, संबंधित अधिकाऱ्याने सुनावणी करून अंतिम निकाल द्यावा लागेल. अशी माहिती आहे.तसेच मोजणीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेजारील जमीनमालकांची माहिती अर्जातच द्यावी लागणार आहे.

जागेचा कच्चा नकाशा आणि चतुःसीमेची माहिती अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. संबंधित जागेच्या खरेदीखताची प्रत आणि हक्क संपादनाचा पुरावा देखील द्यावा लागेल, जेणेकरून चुकीची जागा मोजली जाणार नाही. या प्रक्रियेमुळे एकाच जागेच्या मोजणीत होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!