आता महसूल विभाग ‘ई -चावडी सिटीझन पोर्टल’ अंमलात आणणार!! महसूल विभागाचा निर्णय…


पुणे : राज्यात गेल्या काही दशकभरापासून भूमी अभिलेख यंत्रणा पुढच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता ई -चावडी प्रणाली अधिक विकसित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षापासून जमीन महसूल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, जी राज्यभर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

सध्या ऑफलाइन शेतसारा कर वसुलीमुळे तलाठी आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे यामध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने ‘ई -चावडी सिटीझन पोर्टल’ अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तसेच यातून शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत. महसूल विभागाने याबाबत माहिती दिली आहे. आता पोर्टलमुळे शेतसारा वसुलीच्या पारंपारिक ऑफलाइन प्रक्रियेला पूर्णविराम मिळणार असून लवकरच संपूर्ण प्रणाली डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात याबाबत प्रकिया सुरू होईल.

तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता दिसणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीसंबंधी कोणतेही सरकारी व्यवहार पार पाडताना ‘जमीन महसूल पूर्ण भरलेली पावती’ महत्त्वाची असते. असे असताना मात्र याआधी ऑफलाइन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दरम्यान, .https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या पोर्टलवर कृषी संबंधित सर्व कर जलद आणि सोप्या पद्धतीने भरण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक बदल आपल्याला दिसणार आहेत. याबाबत अनेक बदल झाले तर आपली कामे देखील लकरच पार पडणार आहेत.

आता ‘ई-चावडी सिटीझन पोर्टल’च्या माध्यमातून नागरिकांना सुलभरीत्या ही प्रक्रिया उपलब्ध होणार आहे. याची पूर्वतयारी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या पोर्टलवर प्रत्येक जमीनधारकाची महसूल मागणी खातेनिहाय दर्शवली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!