भाजप नेत्याच्या पापाचा घडा भरला!! आता पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

नाशिक : नाशिक आणि मुंबईनंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल लोढाविरुद्ध बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

तसेच ही तक्रार ३६ वर्षीय महिलेने १७ जुलै रोजी केली असून, तिने दिलेल्या जबाबात प्रफुल लोढावर नोकरीच्या आमिषावरून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून इतक्या दिवसांपासून गुप्त ठेवण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय निर्माण झाला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये राहणाऱ्या महिलेला लोढाने तिच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. याच बहाण्याने २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये तिला बोलावून घेतले. तिथे त्याने थेट “पतीला नोकरी हवी असेल तर तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली.

पीडित महिलेने विरोध केला असता, तुझी नोकरी देखील घालवीन, अशी धमकी देत लोढाने तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.सध्या प्रफुल लोढा मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे.

दरम्यान, त्याच्यावर आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल असून, आता पुण्यातही बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानं त्याच्यावर आणखी कलम ३७६ आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.