तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2 हजार मिळत नाहीत का? त्यामागची खरी कारणे आता आली समोर, शेतकऱ्यांनो जाणून घ्या..


मुंबई : केंद्र सरकरची महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान ही योजना गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र यामध्ये अनेकांना आधी पैसे मिळत होते, मात्र आता अनेकांना पैसे मिळत नाहीत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आले असून, काही नव्या निकषांनुसार पात्रतेची छाननी सुरू आहे.

महाराष्ट्राबाहेरील नागरिक, दुबार नोंदणी करणारे अर्जदार, निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, संविधानिक पदांवर असलेले व्यक्ती, अनिवासी भारतीय तसेच ओळख निश्चित न होणारे अर्जदार योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. यामुळे याबाबतचे नियम शेतकऱ्यांना माहिती नाहीत.

राज्यभरात या अपात्र शेतकऱ्यांची तपासणी सुरू असून, नव्याने आवश्यक कागदपत्रे गोळा केली जात आहेत. मात्र, कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबत अंतिम निर्णय संबंधित समिती घेणार आहे. 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी स्वतःच्या नावावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ लागू होणार. अनेक शेतकरी याबाबत फक्त बँकेत हेलपाटे मार्ट आहेत.

योजनेंतर्गत आधार कार्ड व बँक खाते क्रमांक नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला मदतीचा लाभ मिळाला होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदानामुळे अनेक शेतकऱ्यांनी नंतर अर्ज सादर केले, मात्र तपासणी दरम्यान काहीजण अपात्र ठरले. काही अपात्र ठरलेले शेतकरी नव्याने कागदपत्रे सादर करत असून, त्यांची पडताळणी प्रक्रियेत आहे.

त्यांची पडताळणी झाली की याबाबत पैसे मिळवणार आहेत. कृषी आयुक्त कार्यालयाकडून संपूर्ण चौकशी पूर्ण केल्यानंतरच अंतिम पात्र-अपात्र यादी जाहीर केली जाईल.गावपातळीवर कृषी सहाय्यक अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी तपासत असून, आवश्यक असल्यास योग्य अर्जदारांचे प्रस्ताव पुन्हा सादर केले जातील.

तसेच यामध्ये विदेशात राहणारे किंवा अनिवासी भारतीय (NRI). नोंदणीकृत व्यावसायिक आणि उद्योगपती. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी जे आधीच पेन्शन घेत आहेत. सज्ञान नसलेले (वय अपूर्ण असलेले). चुकीची माहिती देऊन नोंदणी करणारे किंवा ओळख न पटलेले. आयकर भरणारे व्यक्ती, यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!