15 जूनपर्यंत पावसाची शक्यता नाहीच; मान्सूनची मंद प्रगती, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, सरकारचा पेरणीबाबत सावध राहण्याचा इशारा


मुंबई : यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तो अपेक्षेपेक्षा उशिरा केरळात पोहोचला असून आता तळकोकणातही त्याचे आगमन झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान अंदाजानुसार 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा ठरणार नाही, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 12 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान उच्च राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ व खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंशांदरम्यान राहू शकते.

या पार्श्वभूमीवर कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच विजांच्या कडकडाटात झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीजखांबाजवळ थांबू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!