पुण्यातील आयसिस मॉड्युल प्रकरणी ‘एनआयए’ची मोठी कामगिरी, दोन वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक..


पुणे : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवर गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय तपास संस्था शोध घेत होती. पुण्यातील कोंढवा भागाशी संबंधित स्लीपर मॉड्युल प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी माहिती एनआयएला मिळाली होती, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली आहे.

अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दोघांची ओळख आहे. हे दोघे पुण्यात २०२२-२३ दरम्यान कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी म्हणजेच स्फोटक उपकरण तयार करत होते. त्यांनी स्फोटक बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि चाचणीसाठी नियोजित स्फोटही घडवले होते. या दोघांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

त्यांचा संबंध आधीच अटक करण्यात आलेल्या आठ स्लीपर मॉड्युल सदस्यांशी होता. या सर्वांनी मिळून भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचला होता आणि देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. या कटामुळे देशातील शांतता आणि धार्मिक सौहार्द धोक्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत NIA ने एकूण १० दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात UAPA, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब काझी, झुल्फिकार बडोदावाला, शमिल आणि अकिफ नाचन, तसेच शहनवाज आलम यांचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!