अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी आता नवा नियम, ‘या’ लोकांना मिळणार नाही प्रवेश, जाणून घ्या नवीन नियम…


कोल्हापूर : राज्यातील प्रसिद्ध अंबाबाई आणि जोतिबा मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत आता बदल होणार आहे. या नवीन धोरणानुसार, मंदिरात येताना विशिष्ट पोषाख घालणे आवश्यक असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. समितीने भाविकांना मंदिरात येताना पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा मंदिर या दोन्ही पवित्र स्थळांसंदर्भात हा निर्णय जाहीर केला आहे. आता दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता आता ड्रेस कोड, अर्थात विशिष्ट वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याबाबत माहिती अशी की, मंदिरातील धार्मिक पावित्र्य, मांगल्यपूर्ण वातावरण आणि पुरातन परंपरा यांचे संरक्षण व्हावे, या प्रमुख उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. देवळाच्या गांभीर्याला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे हा यामागील हेतू आहे, असेही सांगण्यात आले आहे.

या निर्णयाची अधिकृत सूचना देवस्थान समितीमार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, जर कोणीही भाविक तोकड्या किंवा भारतीय संस्कृतीशी विसंगत, अशोभनीय वस्त्रे परिधान करून मंदिरात दर्शनासाठी आल्यास, त्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. असे समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात अनेक मंदिरात या आधीच असा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी याला विरोध झाला तर काही ठिकाणी तो मान्य करण्यात आला. मंदिर प्रशासन याकडे लक्ष देणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!