ना सार्वजनिक सुट्टी, ना आठवड्याचा शेवट, मार्चच्या ‘या’ आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, काय आहे यामागचं कारण?


Bank News : मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच क्षेत्रांमध्ये हिशोबाची जुळवाजुळव करण्याला प्राधान्य दिलं जातं. या साऱ्यामध्येच एकिकडे हिशोबाची सर्व गणितं अंतिम टप्प्यात असतानाच आता महिन्याच्या शेवटच्या आठव्यामध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळंच अनेकांना फटका बसू शकतो.

महिन्याचा चौथा आठवडा असल्यामुळं २२ तारखेचा शनिवार आणि २३ तारखेचा रविवार ही आठवडी सुट्टी असून, बँका सोमवार आणि मंगळवार अर्थात २४-२५ मार्च रोजीसुद्धा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सार्वजनिक सुट्टी किंवा आठवड्याचा शेवट नसतानाही २४ आणि २५ मार्च रोजी बँका बंद राहण्याचे मुख्य कारण म्हणजे बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. इंडियन बँक्स असोसिएशन सोबतच्या चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे.

बँकांमध्ये रिक्त जागांवरील भरतीच्या मागणीला उचलून धरत त्यासोबतच सलसरकट पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा आणि ग्रॅच्युइटी रकमेत वाढ अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.

वरील मागण्यांना अनुसरून बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यामध्ये चर्चा सुरू असूनही त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. ज्यामुळं बँकांनी अखेर संपाचा मार्ग निवडल्याचं म्हटलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!