Neeraj Chopra : पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला हुलकावणी! नीरज चोप्राला रौप्यपदक, थोडक्यात हुकला चान्स..

Neeraj Chopra : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडक दिली होती. भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात होती.

अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. अर्शद नदीमनं टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटर होता, त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले. यामुळं नीरज चोप्रानं रोप्य पदक जिंकले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले.
नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या. नीरज चोप्रानं पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. नीरज चोप्राचा हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलेला. यामुळं भारतातील कोट्यवधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या. Neeraj Chopra

नीरज चोप्रानं पात्रता फेरीत सर्वात लांब म्हणजेच 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला होता. भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत झेक प्रजासत्ताकचा याकूब वालेश, जर्मनीचा ज्यूलियन वेबर आणि ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सचं देखील आव्हान होतं. अँडरसन आणि याकूब यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी 90 मीटर आहे. नीरज चोप्राचा सर्वोत्कृष्ट थ्रो 89.94 मीटर आहे. नीरज चोप्रासमोर पाकिस्तानच्या अर्शद नदीमच देखील आव्हान असेल.
