पुण्यात राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या ; मैदानातच चिरला गळा, प्रत्यक्षदर्शींनी कोर्टात सांगितला थरार

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी भागात एका राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीची एका तरुणाने भयंकर वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून तब्बल २२ वार केले होते.भरमैदानात तिला गाठून तिचा गळा चिरला होता. या प्रकरणीआरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या वकिलाने केली आहे. यावेळी १२ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. त्यांनी थरकाप उडवणारा घटनाक्रम कोर्टात सांगितला.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम उर्फ ऋषीकेश बाजीराव भागवत (वय २२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्याविरुद्ध खून करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत.आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी शुक्रवारी न्यायालयात केली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

दरम्यान विशेष सरकारी वकील झंझाड यांनी केला. ते म्हणाले, आरोपीने मुलीचा निर्घृण खून केला. तिचा गळा चिरला. आरोपीने तिच्यावर २२ वार केले. मृत्यू झाल्यानंतरही तो मुलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करत होता. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तो दयेस पात्र नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा योग्य होईल. समाजातही योग्य तो संदेश जाईल,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.या प्रकरणात सरकार पक्षाकडून १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. बचाव पक्षाकडून या प्रकरणात १६ ऑक्टोबर रोजी अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे.

