कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; पाहा कोणाला मिळाली कोणती जबाबदारी…


मुंबई : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सुनावणीतील एका टिप्पणीचा आधार घेत अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची (CJP) स्थापना केली होती. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवरील पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिपके भारतात परतले होते.

महिनाभराच्या आंदोलनानंतर CJPच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. त्यानंतर CJP दबावगट म्हणून काम करेल, अशी घोषणा दिपके यांनी केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJPची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक?’ हे देशव्यापी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली.

कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..

संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दिपके
सहसंयोजक: आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटना प्रभारी: अजिंक्य शिंदे
संघटना सहप्रभारी: दीपक बलियान
राष्ट्रीय सचिव: अफ्रीन नवाज
मीडिया प्रमुख: विजय रेड्डी मलंगी
कायदेविषयक घडामोडी प्रमुख: रत्ना सिंग
रिसर्च अँड पॉलिसी लीड: वैष्णवी गौर
टेक्नोलॉजी लीड: रोहन देशपांडे
फायनान्स लीड: योगेश इंगळे

विभागीय प्रमुख..

उत्तर विभाग: दीपक बलियान
दक्षिण विभाग: विजय रेड्डी मलंगी
पूर्व आणि ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज
पश्चिम विभाग: योगेश इंगळे

अभिजीत दिपके यांनी CJPच्या सहकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत, “जेन झीने सरकारला झुकवलं,” असा दावा केला. आंदोलनामुळे नागरिकांच्या मनातील सरकारची भीती कमी झाली असून, नागरिक सरकारला प्रश्न विचारतील आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरतील, असे दिपके म्हणाले.

सप्टेंबरमध्ये CJPकडून देशव्यापी ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभर दौरा करून जनतेच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेणार असल्याचेही अभिजीत दिपके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!