Namdevrao Jadhav : शरद पवारांवर आरोप करणं येणार अंगलट, नामदेवराव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल


Namdevrao Jadhav : लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे १४ वे वंशज नामदेव जाधव यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नामदेवराव जाधव स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे १४ वे वंशज असल्याचे खोट सांगून जनेतची दिशाभूल करत आहेत आणि मोठ्या रक्कमा जमा करत आहेत.

याशिवाय मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देत असून शरद पवार यांच्याबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. याप्रकरणी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कारण जाधव यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले, ते म्हणाले, शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण घालवं, याला आरोप म्हणता येणार नाही, तर ते आमचे ठाम मत आहे. २३ मार्च १९१९४ ला शरद पवार मुख्यमंत्री असताना जे मराठे यादीमध्ये १८१ नंबरला होते, त्यांच्यावर फुली मारली आणि १८२ नंबरला तेली होते आणि १८३ नंबरला माळी होते. त्यांना एका डेस्क ऑफिसरच्या सहीने आरक्षणामध्ये घेतलं गेलं. ज्यावेळी ओबीसीची पहिली यादी बनली त्याच्यामध्ये १८० जाती होत्या. Namdevrao Jadhav

सुधारित यादीत १८१ क्रमांकांवर मराठा, १८२ क्रमांकावर तेली तर १८३ ला माळी होते. मग क्रमांक १८१ गायब कसा झाला? जे आरक्षण ११ टक्के होतं ते १४ टक्के झालं तेव्हा लेव्हा पाटील, लेव्हा कुणबी आणि लेव्हा पडीदार या तीन जातींचा समावेश केला तेव्हा त्यांची कुठली कागदपत्रं घेतली गेली होती? कोणते आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध झाले होते? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण १४ वरुन २७ टक्क्यांवर नेलं मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून तेली आणि माळी या दोन जातींचा समावेश केला.

शरद पवारांनी हा निर्णय नेमक्या कोणत्या दबावाखाली घेतला? त्यांच्यापुढे कोणत्या अडचणी होत्या? केंद्रात मंडल आयोग लागू होत होता, त्यावेळी व्ही. पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी त्यांच्या आधी पुरोगामी निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी शरद पवार यांनी मराठ्यांचं भविष्य गाडून टाकलं.

आता यावर हे सांगितलं जातं आहे की त्या GR वर शरद पवारांची मुख्यमंत्री म्हणून सही नाही, राज्यपालांची सही आहे. मात्र जेव्हा कुठलाही जीआर निघतो तेव्हा त्यावर राज्यपालच सही करतात मुख्यमंत्री नाही. असेही नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे, ते काऊ भमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!