Nagpur Crime News : धक्कादायक! दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राचा काढला काटा, घटनेने उडाली खळबळ…

Nagpur Crime News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत.

आता नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी रात्री सन्यालनगर टेकानाका येथे घडली. या घटनांमुळे शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.

मंगेश गणेश मेंढे (वय.४५ रा. उन्नती कॉलनी, कपिलनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तू उर्फ दत्त्या राहुल रमेश रामटेके (वय.१९, मानवनगर, टेकानाका) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मंगेश मेंढे हा रेतीचा व्यवसाय करत असून त्यांची दत्तूसोबत मैत्री होती. दोघे सोबत काम देखील करत होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मंगेश आपल्या घरी जाताना दत्तू त्याला भेटला. Nagpur Crime News
त्याने मंगेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र मंगेशजवळ पैसे नसल्याने त्याने पैसे दिले नाहीत. दरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि हा वाद फार विकोपाला गेला. याच वादातून संतप्त झालेल्या दत्तूने आपल्या जवळील चाकू काढून मंगेश यांच्या डाव्या बाजूला छातीवर तीन वार केले. यात मंगेश गंभीर जखमी झाला.
दरम्यान, वार केल्यानंतर दत्तूने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मंगेश बराचवेळ तसाच पडून होता. त्यानंतर नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली आणि मंगेशला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दत्तू यास अटक केली आहे. भरदिवसा झालेल्या हा हत्येमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते.