राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाची हत्या; तब्बल 18 वर्षानंतर कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वाचा ‘हा ‘निकाल


पुणे : कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवले असून, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष सुटका केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत अधिक माहिती अशी की,23 मार्च 2006 रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी 10 एप्रिल 2007 ला विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या हत्येप्रकरणी महेश पाटील यांच्यासह 13 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कल्याण जिल्हा न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवल असून त्यांना ७ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. उर्वरित दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गेल्या 18 वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.आता या कल्याण न्यायालयाच्या निकालानंतर याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!