उरुळी कांचनमध्ये ८ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा निकाल लागला, गुन्ह्यातील ३ आरोपींची निर्दोष मुक्तता….

उरुळी कांचन : उरुळी कांचनमध्ये ८ वर्षांपूर्वी अमोल कोतवाल याच्या खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या कोर्टाने हा निकाल दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
याबाबतची माहिती आरोपीचे वकील अँड. नितीन भालेराव यांनी दिली. गुन्ह्यातील चौथा आरोपी स्वागत खैरे मयत झाल्याने त्याला वगळून ३ आरोपींच्या विरुद्ध खटला चालवला गेला होता. राजेश लोंढे, महादेव अदलिंगे, अक्षय रेडे अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी मयत अमोल कोतवाल यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा आता निकाल जाहीर करण्यात आला आहे. २०१६ रोजी मयत अमोल कोतवाल याचा आरोपी राजेश लोंढे याचे बरोबर बॅनर फडण्यावरून वाद झाला होता.
यामुळे मनात राग धरून चार आरोपींनी मयत अमोल कोतवालचा खून केला होता. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. तेव्हापासून याबाबत सुनावणी सुरू होती.
दरम्यान, आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पूणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने सर्व आरोपीना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. या कामी अँड. मयूर चौधरी यांनी मदत केली.
गुन्ह्यातील चौथा आरोपी, स्वागत खैरे, हा उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणात मयत झाल्याने त्याला वगळून खटला चालवला होता. यामध्ये 17 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपी तर्फे अँड. विपुल दुशिंग आणि अँड. नितीन भालेराव यांनी युक्तिवाद केला. आता याबाबत निकाल आला आहे.