पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका मैदानात!! मिसिंग लिंक, रस्त्यांचे रुंदीकरण अन्…; घेतला मोठा निर्णय


पुणे : शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला असून आता १०० दिवसांच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामुळे आता तरी पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात ३० मिसिंग लिंक व रस्ता रुंदीकरण करून ९ बॉटल नेक काढून टाकले जाणार आहेत.

तसेच शहरात १५ आदर्श रस्त्यांसोबतच उर्वरीत १७ रस्त्यांचेही डांबरीकरण, रुंदीकरण व वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमांनावर बुलडोजर चालवला जाणार आहे. यामुळे आता लवकरच अनेक रस्ते रुंद होतील असे सांगितले जात आहे. पुणे पालिकेतर्फे वाहतूक कोंडी होणारे रस्ते ओळखून तेथील अतिक्रमण हटवले जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्राधान्याने वाहतुकी कोंडी सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत. जेथे वाहतूक कोंडी होते त्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या होत्या. यामुळे आता प्रशासन कामाला लागले आहे.

तसेच पोलिसांची मदत देखील त्यांनी घ्या अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता पुणे महानगर पालिकेने उपाय योजना सुरू केल्या आहेत. पुण्यात वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच शहरात विकासकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे येणाऱ्या काळात निर्णय घ्यावे लागणार आहेत.

दरम्यान, पालिकेने पुण्यातील ३० मिसिंग लिंक आणि ९ बॉटल नेक काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. चौका चौकात होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे पुणेकर वैतागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!