मुळशी हादरले! आईस्क्रीम विक्रेत्याचं संतापजनक कृत्य; मुलीला जवळ ओढत गैरवर्तन, गावकऱ्यांनी आरोपीला पकडलं अन्…


पुणे : मुळशी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरात संतापाचे वातावरण आहे. आईस्क्रीम विक्रेत्याच्या नावाखाली आलेल्या व्यक्तीने १४ वर्षीय मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आरोपी गावात आईस्क्रीम विकण्यासाठी आला होता. यावेळी पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असताना, आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तत्काळ तिथून सुटून घरी जाऊन कुटुंबीयांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून पौड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!