मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे संतापल्या, केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे मस्साजोग गावाला उद्या भेट देणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळे बारामतीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, मी पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून या प्रकरणात पाहिलं नाही.
मला फक्त माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे पाहायचे होते आणि ते ही या प्रकरणाकडे माणुसकी म्हणूनच पाहतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र दुर्दैव आहे. माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. ते रोज पोट तिडकीने चॅनलवर बोलत होते.
त्यामुळे मला असे वाटले होते की, जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीडमधील गुन्हेगारी थांबत नाही तोपर्यंत ते स्वस्त बसणार नाहीत. अशी माझी भाबडी अपेक्षा होती. उद्या सुप्रिया सुळे परळी शहरालाही भेट देणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या बाल्लेकिल्ल्यात सुप्रिया सुळे उद्या जातील. यावेळी त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला का…? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले आहे. उद्या या प्रकरणी त्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. याबाबत सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे.