माता न तु वैरीन; पुण्यात आईकडून पोटच्या लेकीची हत्या,स्वतः हीं उचलल टोकाचं पाऊल..


पुणे: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच आता आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.जन्मदात्या आईने २ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलीस तपास करत असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शारवी आदिनाथ देवडकर (वय २) असं मृत मुलीचं नाव आहे आणि तिच्या आईचे नाव छाया आदिनाथ देवडकर (वय २८) असे आहे. मुलीच्या आजाराला कंटाळलेल्या आईने पोटच्या लेकीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

छाया चे पती आदिनाथ देवडकर, पत्नी छाया आणि मुलगी शारवी असे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास होते. शारवीला अस्थिविकार असल्याचे निदान झाले होते. त्याबाबत उपचार सुरू होते. मुलीला झालेल्या या आजारामुळे छाया नैराश्यात होत्या. याच नैराश्यातून त्यांनीं हे टोकाचे पाऊल उचलल आहे.

दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!