ठाण्यात आईकडून साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा अमानुष छळ; ‘जेवण देत नव्हती, गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले’, आई अटकेत


ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली आहे. किसन नगर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्याच सख्ख्या आईकडून सातत्याने मारहाण आणि छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित बालकाने स्वतःवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित महिलेला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हा चिमुकला आपल्या आजीसोबत वागळे इस्टेट येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत आला होता. त्याच्या अंगावरील जखमा, पाठीवरील व हातापायांवरील भाजल्याच्या खुणा पाहून उपस्थितांना संशय आला. शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी बालकाशी संवाद साधला असता त्याने आईकडून होत असलेल्या छळाची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

उपचारादरम्यान बालकाने, “आई मला रोज मारते, जेवायला देत नाही. गरम चाकूने चटके दिले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करते. एकदा माझा गळाही दाबला, त्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास झाला,” अशी धक्कादायक माहिती दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.

घटनेची गंभीर दखल घेत शाखाप्रमुख सुनील मोरे आणि महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन तिला वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आणले. पीडित बालकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी आईला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून बालकाची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे बालसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!