सौदी अरबमध्ये मोठा अपघात! हज यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू, घटनेने सर्व देश हळहळला…


नवी दिल्ली : सौदी अरेबियातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियात झालेल्या एका भीषण बस अपघातात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १.३० वाजता बद्र–मदिना महामार्गावर प्रवासी बस आणि डिझेल टँकरची जोरदार धडक होऊन प्रचंड स्फोट झाला.

या स्फोटानंतर बसने पेट घेतला आणि आत असलेल्या प्रवाशांपैकी अनेक जण जागीच होरपळून मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. या बसमध्ये मक्का येथे दर्शन घेऊन मदिना येथे परतणारे भारतीय भाविक प्रवास करत होते.

ही बस डिझेल टँकरला धडकल्यानंतर काही सेकंदांतच ज्वाळांनी वेढली गेली. त्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये ४२ भारतीय प्रवासी होते आणि सर्वांच्या मृत्यूची भीती वर्तविण्यात येत आहे.

या भीषण अपघातासंबंधी अद्याप स्थानिक प्रशासनाने अधिकृत मृत्यूची संख्या जाहीर केलेली नाही. मात्र मदिना यात्रेचे आयोजन करणाऱ्या टूर ऑपरेटरकडून आतापर्यंत १० भारतीयांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृतांमध्ये २० महिला आणि ११ लहान मुलांचा समावेश असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, हैदराबाद आणि तेलंगणा येथील प्रवाशांचा या बसमध्ये मोठा समावेश होता. मक्का दर्शन पूर्ण करून ते मदिना येथे परतत होते. डिझेल टँकरला बसची धडक होताच भयंकर स्फोट झाला आणि काही क्षणांतच बस जळून खाक झाली. बसचे दार आणि काचांच्या भागांनी स्फोटानंतर विकृती घेतल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले.

दुर्घटनास्थळी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने दाखल झाली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान ठरत आहे, कारण बस पूर्णतः जळून गेली आहे. त्यामुळे शवांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!