Monsoon Update : मोठी बातमी! मान्सून आला रे आला, केरळ आणि ईशान्य भारतात दाखल, जाणून घ्या…

Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आणि उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिली आहे. हवामान विभागानं यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.

नैऋत्य मोसमी मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारताच्याही बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागाने ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. अशातच आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. त्यामुळे लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागानं ट्वीट करत सांगितलं होतं. Monsoon Update

अखेर मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा संपली असून मान्सून केरळ आणि त्यासोबतच ईशान्य भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच, येत्या १० जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचंही सांगितले जात आहे.