इंदापूरात खून झालेला मोक्का शिक्षा भोगून आलेला आरोपी! पोलिसांनी ११ जणांवर दाखल केला गुन्हा..!!


इंदापूर : इंदापूर येथे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेला अविनाश धनवे हा मोक्का कारवाई झालेला आरोपी आहे. त्याचा खून हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींनी केला असून या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अविनाश धनवे असे या हल्ल्यात खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मयत अविनाश धनवे याच्या पत्नीने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश धनवे हा मोक्का शिक्षा भोगलेला आरोपी आहे. तो गेली चार वर्ष तुरुंगात होता. तो गेल्या महिन्यात सुटून आला आहे. ज्यांनी त्याच्यावर हल्ला केला आहे. ते सुद्धा विविध गुन्ह्यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत. आणि त्यांचाही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. हि माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

त्यानंतर काल रात्री ८ च्या सुमारास अविनाश हा जेवणासाठी इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात तो जागीच मृत झाला आहे.

हा हल्ला कोणी केला? कशासाठी केला? याची माहिती अजून समजली नाही. पण हा हल्ला पूर्व वैमानसातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!