परीक्षा पे चर्चा! मोदींचा कॉपी बहाद्दरांना टोला, मुख्यमंत्रीही लागले हसू, नेमकं काय झालं जाणून घ्या…!

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम संपूर्ण देशात दाखवण्यात आला.
यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात, असेही मोदी यावेळी म्हणाले.
तसेच विद्यार्थी बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसे फसवले ? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार ? असेही ते म्हणाले.
दरम्यान, कॉपी करण्याच्या विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या मार्गावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी विनोद केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हसू आवरले नाही. यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे हे मोदींच्या विनोदाचा चांगलाच आनंद घेताना दिसले. तर फडणवीस यांनाही हसू आवरत नव्हते. मुख्यमंत्री ठाण्यात तर उपमुख्यमंत्री हे नागपूरमध्ये होते.