मोदींचं आवाहन अन् लगेचच सोन्या-चांदीचे भाव घसरले; थेट ५ हजारांनी….,ग्राहकांना मोठा दिलासा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागरिकांना सोन्याच्या खरेदीबाबत महत्त्वाचे आवाहन केले. गरज नसेल तर सोने खरेदी टाळा, असे मोदी यांनी म्हटले. यासोबतच परदेशात लग्न करण्याऐवजी देशातच विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर भर देण्याचे आवाहन केले.

परदेशी चलनावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशाने सरकारकडून सोन्याच्या आयातीबाबत विविध पावले उचलली जात आहेत. सोन्याच्या आयातीवरील शुल्कात बदल करण्याबाबतही सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सोन्यावरील आयात शुल्काबाबत काय?

सोन्याची आयात कमी करण्यासाठी यापूर्वी आयात शुल्काच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात आले. मात्र, शुल्क वाढवल्यानंतरही सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली नाही. उलट काही ठिकाणी बेकायदेशीर मार्गाने सोन्याची तस्करी आणि व्यवहार वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याचे या चर्चेत सांगितले जाते.

आता आयात शुल्कात बदल करण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी MCXवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

सोन्याचा आजचा भाव किती?

MCXवर सोन्याच्या दरात सुमारे ३१० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १,५४,१५० रुपयांवर व्यवहार करत होता.

चांदीच्या दरातही घसरण

चांदीच्या दरातही आज घसरण नोंदवण्यात आली. चांदीचा दर प्रति ग्रॅम सुमारे ५ रुपयांनी कमी होऊन २५० रुपयांवर आला. त्यानुसार १० ग्रॅम चांदीचा भाव २,५०० रुपये, १०० ग्रॅमचा भाव २५,००० रुपये, तर एक किलो चांदीचा भाव २.५० लाख रुपयांवर आला आहे.

जागतिक घडामोडींचाही सोन्यावर परिणाम

बाजारातील विश्लेषकांच्या मते, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हशी संबंधित धोरणात्मक भूमिका आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाढता तणाव यासारख्या जागतिक घडामोडींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. त्यातच जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील हालचालींचाही बाजारावर परिणाम दिसून येत आहे.

त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत सध्या चढ-उतार सुरू असून, आगामी काळात जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतातील धोरणात्मक निर्णयांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!