दिल्लीत मोदी सरकारकडून पार्थ पवारांना राजकीय बळ! सोपवली महत्त्वाची जबाबदारी…


नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. पार्थ पवार यांना खासदार करण्यात आले. आता राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यावर केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची संरक्षणविषयक संसदीय स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अडीच महिन्यांपूर्वीच राज्यसभेत प्रवेश केलेल्या पार्थ पवारांना मिळालेल्या या संधीमुळे दिल्लीत त्यांचे वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक राजकीय आणि सरकारी कार्यक्रमात त्यांची उपस्थिती वाढणार आहे. यामुळे कार्यकर्ते आनंदात आहेत.

या समितीत भाजपचे लोकसभा खासदार राधा मोहन सिंह हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून पार्थ पवार या समितीवर काम पाहणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे अर्थसंकल्प, संरक्षण धोरणे, भारतीय सैन्यदलांचे कामकाज, स्वदेशी संरक्षण प्रकल्प, डीआरडीओचे संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या समितीकडे आहेत.

यामध्ये पार्थ पवार यांच्यासह राज्यसभेतील अशोक कुमार मित्तल, दामोदर राव दिवकोंडा, दर्शना सिंह, अभिनेते कमल हासन आणि नरेश बंसल यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही त्यात समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.

पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर ते जास्त सक्रिय दिसले नाहीत. मात्र अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर ते राज्यसभेवर खासदार झाले. आता ते राजकारणात सक्रिय आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!