मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, भाजपच्या खासदाराने लावला नवीन शोध..

नवी दिल्ली : राज्यात सध्या गेल्या दीड-दोन महिन्यांपासून महापुरूषांच्या नावाने राजकारण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब या नावांवरून राजकीय वातावरण तापले आहे. औरंगजेबची कबर काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
असे असताना आता भाजपा खासदारने अकलेचे तारे तोडले. ओडिशातील या खासदाराच्या दाव्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे. ओडिशातील बारगडचे भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी बजेट सत्रात वादग्रस्त विधानाने मोठा दिवा लावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध जोडण्यासाठी त्यांनी वेगळंच वक्तव्य केले आहे.
यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ते म्हणाले, गेल्या जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवराय असल्याचा दावा त्यांनी केला. संसदेत बोलताना त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. त्यांच्या या विधानाने आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. पीएम मोदी हेच वास्तवात शिवराय होते, त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास करण्यासाठी पुन्हा जन्म घेतल्याचा अजब दावा पुरोहित यांनी केला.
त्यासाठी त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संताचा आधार घेतला. या संतांनीच, या बाबानीच आपल्याला ही माहिती दिल्याचे पुरोहित म्हणाले. काँग्रेससह अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर तर पुरोहितांना लोकांनी चांगलाच आरसा दाखवला. यामुळे माफी मागण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे स्वराज्य, त्यांची महानता, त्यांचा आदर्श यांचा अवमान करणारे असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. पुरोहितांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.