मोबाईल स्नॅचींगचे आरोपी अटकेत, दुचाकीसह ४ लाख ६९ हजार रुपयांचे मोबाईल जप्त, लोणी काळभोर पोलिसांकडून मोठी कारवाई…

लोणी काळभोर : मोबाईल स्नॅचींग करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ६९ हजार रुपयांचे मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

विशाल विलास काळे (वय २३, रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी पुणे) व रितेश भिमराव चव्हाण वय १८ वर्षे रा. गोपाळपट्टी मांजरी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, १७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारांस अनिरुध्द संतोष खताळ हे त्यांचे मित्र राजीव शहा यांचे सोबत, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे समोर, पुणे सोलापुर रोड लगत असलेल्या सर्वीस रोडने पायी चालत जात असताना, दोन अनोळखी इसम एका दुचाकी गाडीवरुन पाठीमागुन आले व त्यांनी खताळ यांचे हातातील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेवुन चोरुन नेला. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकास माहिती मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे गुन्हयात चोरुन नेलेला मोबाईल विकण्यासाठी कवडीपाट टोल नाका येथे येणार आहेत. यांवरून पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकाने कवडीपाट टोलनाका येथे सापळा रचुन दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेल्या दोन संशयीतांना ७ जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे विशाल काळे व रितेश चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले. सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये खताळ यांचा हिसकावुन चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईल दाखल गुन्हयातील फिर्यादी यांचा असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांचे ताब्यातील दुचाकी मोपेड गाडी ही त्यांनी गुन्हयात वापरलेली असल्याचे आरोपींनी कबुल केल्याने सदर मोबाईल व दुचाकी ॲक्टीवा गाडी त्यांचेकडुन जप्त करणेत आली व दाखल गुन्हयात त्यांना अटक करणेत आले.

त्यांच्याकडे केलेल्या सखोल तपासात दाखल गुन्हयातील मोबाईल व्यतिरीक्त आणखी विवीध कंपनीचे १८ ॲन्ड्रॉईड मोबाईल हॅन्डसेट जप्त करणेत आले आहेत. सदर १८ मोबाईल हॅन्डसेट हे त्यांनी विविध ठिकाणी अशाचप्रकारे चोरले असल्याचे कबुली दिली आहे. सदर मोबाईल चोरीबाबत इतर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत अगर कसे, याबाबत लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीसांनी आरोपीकडुन एकुण ४ लाख १९ हजार रुपयांचे एकुण १९ मोबाईल फोन व ५० हजार रुपये किंमतीची ॲक्टीवा मोपेड गाडी असा एकुण ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला असुन, सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार संभाजी देवीकर, गणेश सातपुते, रामहरी वणवे, सागर जगदाळे, तेज भोसले, आण्णा माने, बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, राहुल कर्डीले, प्रविण दडस, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, सुरज कुंभार, उषा थोरात यांनी केली आहे.