लाडक्या बहिणीमुळे आमदारांचीं निराशा ; तब्बल नऊ महिन्यापासून एक रुपयाही नाही, निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे….


पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे तब्बल ९ महिन्यांपासून आमदारांना एक रुपयाही मिळालेला नाही.निधीसाठी आमदारांचे हाल होत आहे. यासाठी मंत्रालयामध्ये आमदारांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. निधी मिळत नसल्याने सर्वच आमदारांना मतदारसंघातील कामं करता येत नाहीत. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.हक्काचा आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती आणि विविध खात्यांमधील विकास निधी यामधून गेल्या ९ महिन्यांपासून आमदारांना एक रुपया मिळाला नाही. निधी मिळवण्यासाठी आमदारांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. रोज हे आमदार निधीसाठी धावपळ करत आहे. पण मंत्री कार्यालय आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे या लाडकी बहीण योजनेचा दणका आता आमदारांना बसला आहे.

दरम्यान आमदारांना जो निधी मिळतो त्या निधीमधून ते आपल्या मतदारसंघातील रस्ते बांधणी, समाजमंदिरांचे निर्माण, पथदिवे बसवणे आणि पाणी पुरवठ्यांच्या सुविधा यासारखी कामं करतात. आपल्या मतदारसंघात रखडलेली काम पूर्ण होत नसल्यामुळे आमदारांना जनतेच्या प्रश्नांना देखील सामोरे जावे लागत आहे. पण लाडकी बहिणींसह वेगवेगळ्या सरकारी योजनांमुळे सरकारच्या तिरोजीत खडखडाट आहे. त्यामुळे निधीअभावी २८८ आमदारांचे हाल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!