बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे ‘ते’ कृत्य, चालकावर गुन्हा दाखल..


बारामती : बारामती एमआयडीसीतील विद्या कॉर्नर येथील कॅफे ग्राउंड अपवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन महाविद्यालयीन मुले-मुली बसून अश्लील चाळे करीत असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी संबंधित कॅफेचालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. कॅफेमालक सुहास तानाजी कदम व व्यवस्थापक मयूर बाळू कदम, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बारामतीमधील एमआयडीसी चौक परिसरात अनेक सायबर कॅफे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना निवांतपणे गप्पा मारता येतील, असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे कॅफेत जाण्याकडे अल्पवयीन तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. त्यामुळे संबंधित कॅफेचालकांवर कारवाई व्हावी, अशी नागरिकांमधून चर्चा होत होती.

याबाबत पोलीस निरीक्षक मोरे सांगितले की, पालकांनी सुदधा याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. संबंधित सर्व कॅफे चालकाना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढून नाही टाकले तर त्याचेवरती कठोर कारवाई करण्यात येईल.

संबंधित कॅफेचालकाचे परवाने रदद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाइ करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!