ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ लागणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा…


पुणे : राज्यात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या तस्करीबाबत सरकारने आता अधिक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. आता ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ अर्थात मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच आज विधानपरिषदेत ड्रग्स, विशेषतः एमडी ड्रग्सच्या तस्करीवर चर्चा झाली. सदस्यांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करत कठोर कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नव्या धोरणाची माहिती दिली.

राज्यात ड्रग्सची पाळंमुळे खोदून काढण्यासाठी सरकार आता कायद्यात बदल करणार असून मकोकाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियमावली विधानसभेत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात ड्रग्सविरोधात स्वतंत्र युनिट कार्यरत असून अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या गेल्या आहेत. या प्रकरणातील गंभीर केसेससाठी केंद्र सरकारकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना लवकर शिक्षा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेतील चर्चेदरम्यान भाजप आमदार परिणय फुके यांनी ड्रग्स तस्करीचा मुद्दा जोरात उपस्थित केला. त्यांनी विचारले की, ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो, मग मकोका लावून त्यांच्यावर कठोर कारवाई का करू नये? तसेच पूर्वी तयार करण्यात आलेल्या ड्रग्स विरोधी टास्क फोर्सचे पुढे काय झाले, असा सवालही त्यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!