माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर, मुक्कामाच्या ठिकाणात होणार बदल? जाणून घ्या…

पुणे : सर्वांचे लक्ष लागलेल्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येत्या आठ जुलैला पंढरपूरला प्रस्थान करणार आहे. हा भव्य दिव्य सोहळा लाखोंच्या संख्येने वारकरी यामध्ये सहभागी होतात. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

यामध्ये नऊ आणि दहा जुलैला पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील मुक्कामाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. याबाबत अनेकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आळंदी संस्थानने जाहीर केले आहे.
पालखीचे आठ जुलैला प्रस्थान आणि २४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. आळंदी ते पंढरपूर प्रवासात १७ मुक्काम, चार गोल रिंगण आणि तीन उभी रिंगणे होणार आहेत. यासाठी प्रशासनाने देखील तयारी सुरू केली आहे. भाविकांची वाढती संख्या आणि अपुरी जागा यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा होती.

परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर या वर्षीही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जाहीर केले आहे. याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यंदा पाऊस कसा असणार यामुळे त्याचे देखील नियोजन सुरू आहे.

आठ जुलै आळंदी येथून प्रस्थान, नऊ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी १६ जुलैला लोणंद येथे मुक्कामी असेल.
लोणंद येथून पुढे तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. १७ जुलैला फलटण, १८ जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कामी असेल. तसेच नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी आहे. २० जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी आहे. २१ जुलै रोजी वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. नंतर पालखी पुढील प्रवास करेल.