मुंबईच्या धारावीत झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत


मुंबई : मुंबईच्या धारावी परिसरात माहीम रेल्वे स्थानकाजवळ मोठी आग लग्नाची माहिती समोर आली आहे. ही आग एका तळमजला अधिक एक मजली झोपडी वजा घरात लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि बीएमसीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. आग लागल्याने उपनगरीने रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असून अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सध्या ही आग मुंबईच्या धारावी-माहीम दरम्यान रेल्वे ट्रॅक जवळ लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे जवान प्रचंड शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा वाऱ्याच्या वेगामुळे आग अधिक वेगाने पसरत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जणांनी आपल्या घरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान या घटनेबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले की, ”सध्या ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून आम्ही प्रत्येक शक्यतो मार्ग वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ही परिस्थिती गंभीर आहे आणि नागरिकांनी परिसरातून लांब राहावे.’विशेष म्हणजे ही लागलेली आग फक्त त्या परिसरापूर्ती मर्यादित न राहता जवळपासच्या परिसरातही पसरण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने अतिरिक्त गाड्या मागवल्या आहेत आणि हवेतूनही ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!