मोठी बातमी! प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव, सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ…

प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत.
महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तंबूत जेवण तयार होत असताना ही आग आल्याची प्राथमिक माहिती आली आहे.
आग लागल्यानंतर अनेकदा सिलेंडरचे ब्लास्ट झाले. त्यानंतर २० ते २५ तंबूंना आग लागल्याची माहिती मिळाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २० ते २५ तंबू जळून खाक झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे.
ही आग प्रयागराजमधील शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली आहे. हा सर्व परिसर महाकुंभ मेळा क्षेत्रात येतो. आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे कारण, त्या ठिकाणी तंबूमध्ये अनेक सिलिंडर ठेवण्यात आले आहेत, या सिलिंडरचा एका मागून एक असा स्फोट होत असल्यामुळे आग आधिकच भडकली आहे. अचानक आग लागल्यामुळे महाकुंभ मेळ्यावत चांगलाच गोंधळ उडाला असून, लोक सुरक्षित जागी स्थलांतर करत आहेत.