शिवीगाळ अन केस उपटून मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण ; कल्याणमधील संतापजनक घटना

पुणे : कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या नांदिवलीमधील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये खाजगी रुग्णांलयामध्ये ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गौरव झा या परप्रांतीय व्यक्तीने डॉक्टरांची तातडीने भेट मागितली होती.मात्र तिने मीटिंग सुरू असल्याच सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने तरुणीला अमानुषपणे मारहाण केली. तिच्या पोटावर आणि छातीवर लाथा मारल्या तसेच तिचे केस ओढून तिला फरफटत बाहेर आणलं. मारहाण होत असताना रुग्णांलयामध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र गौरव झा याने तरुणीला बेदम मारहाण केली.माराहणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
नांदिवलीतील प्रकारावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी गुन्हे दाखल करत तरुणाला तातडीने जेलमध्ये डांबले पाहिजे’,असे त्यांनी म्हटले आहे.
