Maratha Reservation : मराठा आरक्षासाठी’उरुळीकांचन’ला उस्फुर्तपणे कडकडीत बंद! शांतता मोर्चा काढून समाजाकडून एकजुटीचे दर्शन..!!

Maratha Reservation उरुळी कांचन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर सुरू झालेल्या आरक्षण एल्गारात उरुळीकांचन (ता.हवेली ) शहरात शनिवार (दि.२९)पासून सुरू साखळी उपोषणानंतर उरुळीकांचन करांनी मंगळवारी (दि.३१) रोजी उस्फूर्तपणे बंद पाळला असून आरक्षणाच्या समर्थनार्थ मोठा मोर्चा ग्रामस्थांनी काढून आरक्षण तीव्रता सकल मराठा एकजुटीने दाखवून दिली आहे. Maratha Reservation
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या चालू आंदोलनात उरुळीकांचन ग्रामस्थांनी सुरुवातीपासून आरक्षणाच्या मागणीला पाठबळ दिले आहे. मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा भूमिकेला या ठिकाणी मोठे समर्थन मिळाले आहे. मराठा समाजाच्या सर्व स्तरांतून या आंदोलनाला बळ मिळाले आहे.

शनिवार( ता. २९) पासून या ठिकाणी साखळी उपोषणाला अबाल वृद्ध,महिला , विद्यार्थी व तरुण वर्ग सहभाग नोंदवित आहे. या ठिकाणी सोशल मिडीया, प्रत्यक्ष बैठका घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दावर एकजूट झाला आहे.


त्याची प्रचिती मंगळवार (दि.३१) रोजी येऊन सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंद च्या दिलेल्या हाकेत उत्स्फूर्त सहभाग मिळून दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत विराट मोर्चा काढून आरक्षणाची तीव्रता दाखवून दिली आहे. दरम्यान आरक्षणाचा मागणीसाठी उरुळीकांचन शहरात साखळी उपोषणानंतर शांतता मोर्चा व बंद मुळे समाजाची एकजुटीचे चित्र दिसले आहे.
सोरतापवाडीत मशाल मोर्चा…
पूर्व हवेली तालुक्यात आरक्षण मागणीसाठी राजकीय लोकांना सर्व प्रथम गाव बंदी घालणाऱ्या सोरतापवाडी ग्रामस्थांनी सोमवार (दि.३०) रोजी मशाल मोर्चा काढीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विशेष म्हणजे मोठ्या संख्येने महिलांनी मोर्चात सहभाग होत पुढील भवितव्य बद्दल जागृकता दाखविली आहे. सरपंच संध्या चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उस्फुर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते.
