Maratha Reservation : चक्क पायाने चारचाकी चालवत भोर ते मुंबई प्रवास, मराठा आंदोलनात तरुणाचे जीवघेणे धाडस…


Maratha Reservation पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील. पिंपरी-चिंचवडमार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील. रात्रीचा मुक्काम लोणावळा गावात होईल.

मनोज जरांगे येत्या २६ जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. अशातच पुण्यातील भोर तालुक्यामधील संतोष राजशिर्के या तरूणाने अनोख प्रण केला आहे. भोर तालुक्यातील गवडी या गावामधील संतोष राजेशिर्के हा तरूण पायाने गाडी चालवत भोर ते मुंबई असा जीवघेणा प्रवास करणार आहे.

ड्राइवर शेजारच्या पॅसेंजर सीटवर बसून पायाने चारचाकी गाडीचं गाडीचं स्टेरिंग नियंत्रित करणार आहे. भोर ते मुंबई जवळपास ३०० किमी अंतर असून हा प्रण त्यांच्या अंगलट येवू शकतो. मात्र पंचकृशीमध्ये संतोष राजेशिर्केच्या या स्टंटची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. Maratha Reservation

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोर मधून निघालेल्या मराठा समाजाच्या ताफ्यासोबत राजेशिर्के स्विफ्ट गाडी घेऊन रवाना झाला आहे. सरकारने आरक्षण बाबत गांभीर्याने विचार करावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा भोरमधील स्टंटमॅन भोर ते मुंबई प्रवास हा गाडी पायाने गाडी चालवत निघालेलाय. याआधीही त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चारचाकी रिव्हर्समध्ये चालवत पुण्याहून मुंबई गाठली होती.

दरम्यान, मराठा समाज आरक्षणासाठी काहीही करू शकतो हे दाखवून देण्यासाठी हा स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया राजेशीर्के यांनी दिली आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आता आक्रमक झालेला पाहायला दिसत आहे. मात्र असा जीवघेणा स्टंट करणं कितपत योग्य आहे असा सवालही काहींनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!