Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा, मुख्यमंत्री शिंदेंना दुसरा धक्का

Maratha Reservation नाशिकमधून मोठी बातमी समोर येत असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी देखील राजीनामा दिला आहे.
हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला राजीनाम्याबाबत कळवलं आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता राजीनामा देत असल्याचं हेमंत गोडसे म्हणाले आहेत. Maratha Reservation
तसेच राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने मराठा समाज नाराज असल्याची भावना असल्याचं म्हणत शिंदे गटाच्या आतापर्यंत दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
काही तासांपूर्वीच खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले असून त्यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे नाशिकमधून पहिल्यांदा हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा दिला असून लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी राजीनाम्याद्वारे करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.