मराठा आंदोलक मुख्यमंत्री फडणवीसांच्या बाजूने बोलले ;म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्यावर आम्हाला शंका नाही पण….


पुणे : बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना
बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा मोर्चा नसून, ठराविक जातींचा मोर्चा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो. मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला शंका नाही. आम्हाला पक्के माहिती आहे की, त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवले आहे. असे म्हणत त्यांनी त्यांची बाजू घेतली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इमेज डॅमेज करायचा काही लोकांचा प्रयत्न आहे. फडणवीस यांना जितके अडचणीत आणता येईल, तितके प्रयत्न या लोकांचे सुरू आहेत. त्यांना कसा फटका बसेल, याचे काम ते करत आहेत आणि त्यासाठी बीडचा मोर्चा काढला आहे.सरकारमध्ये यांचेच लोक, मोर्चे काढणारे अजित पवारांचे लोक आहेत, हे यांना कळत नाही का? मात्र, फडणवीसांवर शंका येते की, मुंबईतल्या आंदोलनाच्या गाड्यांना आता नोटीस आल्या आहेत. मात्र, गोड बोलून वार करू नये. पण सध्या तर फडणवीसांबद्दल असे वाटत नाही, असे मराठा आरक्षण मिळण्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान बीड मधील एल्गार सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत ओबीसीच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे काम काही लोक करत आहेत.त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाची मने जिंकली आहेत.. देवेंद्र फडणवीस यांना गोरगरीब मराठ्यांचा विचार केला आणि जीआर काढला आहे. तोही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन काढला आहे, असे जरांगे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!