ओबीसी नेत्याची कार जाळणारा मनोज जरांगेचा खास माणूस! पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


पुणे : ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची चारचाकी गाडी ( 21 सप्टेंबर )एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.त्या व्यक्तीचे नाव विश्वंभर तिरखे असं आहे. तिरखे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा खास माणूस असल्याचा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. आता त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बसलेला तिरखे याचा फोटोच दाखवला आहे.ते म्हणाले, जरांगेचा निकटवर्तीय तिरुके नावाचा माणूस आहे. मनोज जरांगेसोबत असल्याचा फोटो देखील आहे माझ्याकडे. जरांगेचा अत्यंत खास आणि जवळ आहे तो. नारायण गडावर ते दोघे गेले होते. तेव्हा तिथल्या महंताने दोघांच्या गळात एकच माळ टाकली होती.’ असं त्यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी नवनाथ वाघामारे यांची स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकणारां आरोपी विश्वंभर तिरुखे याला अटक केल्यानंतर त्याने
गाडी जाळल्याचा गु्न्हा देखील कबुल केला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामीन देखील मंजुर केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जरांगे म्हणत होता असे आम्ही धंदे करत नाही. आम्ही 96 कुळी मराठे आहोत. जरांगेचा फक्त दंगल घडवण्याचा हेतू आहे. माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही, समाजाचे काम करायचे मी कधी बंद करणार नाही. पण जरांगेचे दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे.’, असे देखील वाघमारे यांनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!