Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे उपोषण मागे घेण्याची शक्यता, म्हणाले…

Manoj Jarange Patil जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले आहे. रविवार पासून त्यांनी त्यांचे उपोषण तीव्र केले असून त्यांनी उपचार आणि पाणी घेणेही बंद केले आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. (Manoj Jarange Patil)
त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली आहे.
त्यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढतच चालला आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा देखील दिसत आहे, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जवळपास तीन वेळा त्यांची भेट घेतली आहे आणि भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील केला आहे. यानंतर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावत या विषयावर मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा केली.
या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा असे एकमत झाले. त्यानंतर आज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या बांधवांशी याबाबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यांनी आपण उपोषण सोडलं तरी उपोषणस्थळी तळ ठोकून राहू.
दरम्यान, आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे. तसेच १२ ऑक्टोबरला मोठा मेळावा होईल असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे आता मनोज जरांगे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या लक्ष लागल आहे.